ग्रामपंचायत ही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. गावातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, नियमित व योग्य पाणीपुरवठा व्यवस्था राखणे तसेच गाव स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या सर्व योजना व उपक्रमांची माहिती गावातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे, पात्र लाभार्थ्यांना त्या योजनांचा लाभ मिळवून देणे आणि पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन देणे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.